Lalu Prasad Yadav Angry: सासुरवाडीत गेले अन् लालू प्रसाद यादव रुसले..

अनुराधा धावडे

लालू प्रसाद यादवांची विनोदी शैली

राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) सुप्रीमो लालू प्रसाद यादव हे नेहमीच त्यांच्या विनोदी शैलीमुळे चर्चेत असतात. असाच त्यांचा एक नवा किस्सा समोर आला आहे.

Lalu Prasad Yadav | Sarkarnama

फुलवारिया

मंगळवारी तब्बल १० वर्षांनंतर लालू प्रसाद यादव आपल्या पत्नी आणि माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्यासोबत त्यांच्या मुळ गावी फुलवारिया येथे पोहचले.

Lalu Prasad Yadav | Sarkarnama

राबडी देवी यांच्या माहेरी

त्यानंतर तिथून काही अंतरावर असलेल्या राबडी देवी यांच्या माहेरी म्हणजेच सेलार काला इथेही गेले होते.

Lalu Prasad Yadav | Sarkarnama

सेलार काला

सेलार कालात पोहचल्यानंतर जावई लालू प्रसाद आणि राबडी देवी यांना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जमले होते.

Lalu Prasad Yadav | Sarkarnama

राबडी देवी माहेरी आल्या

गावातील काही महिला आल्या आणि राबडी देवी यांना घेऊन निघुनही गेल्या. पण लालू प्रसाद यादव मात्र गाडीतून उतरायला तयार नव्हते.

Lalu Prasad Yadav | Sarkarnama

लालू प्रसाद यादव रुसले

गावाकडे जावई रुसून बसण्याचे अनेक किस्से आपण ऐकतो, तसे लालू प्रसाद यादव देखील रुसून बसले

Lalu Prasad Yadav | Sarkarnama

लालू प्रसाद यादवांचा जावई हट्ट

जोपर्यंत माझे मेहुणे मला घ्यायला येत नाही, तोपर्यत आपण काही गाडीतून उतरणार नाही, असा हट्टच धरून बसले

Lalu Prasad Yadav | Sarkarnama

रमाकांत यादव गाडीजवळ पोहोचले

अखेर राबडी देवी यांचे चुलत भाऊ रमाकांत यादव गाडीजवळ पोहोचले आणि त्यांना घरात येण्याची विनंती केली.

Lalu Prasad Yadav | Sarkarnama

अखेर गाडीतून उतरले

त्यानंतर लालू प्रसाद यादव गाडीतून उतरले आणि सासुरवाडीच्या घरात गेले.

Lalu Prasad Yadav | Sarkarnama

Next : बाईक राइड, मुलांसोबत मस्ती... लडाखमध्ये दिसली राहुल गांधींची हटके स्टाईल, पाहा फोटो !

Rahul Gandhi | Sarkarnama