Rashmi Mane
यूपीएससी परीक्षा ही भारतातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. ही परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी उमेदवार प्रचंड मेहनत करत असतात.
'यूपीएससी' परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व उमेदवारांना प्रशिक्षणासाठी LBSNAA येथे जावे लागते. पण तुम्हाला माहीत नसेल LBSNAA म्हणजे काय ? कुठे आहे ?
'यूपीएससी' पूर्व, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीचा राऊंड हे तिन्ही टप्पे पार केल्यानंतर, त्यांच्या रँकनुसार पदे दिली जातात.
यूपीएससी परीक्षा आणि मुलाखतीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना लाल बहादूर शास्त्री नॅशनल अॅकॅडमी ऑफ अॅडमिनिस्ट्रेशन(LBSNAA) येथे 3 महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाते.
उत्तराखंडमधील मसुरी येथे डोंगराळ भागात ही अॅकॅडमी आहे.
लालबहादूर शास्त्री नॅशनल अॅकॅडमी ऑफ अॅडमिनिस्ट्रेशनची स्थापना 15 एप्रिल 1958ला तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री पंडित गोविंद वल्लभ पंत यांनी केली होती.
LBSNAA मध्ये प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर, आयएएस कॅडरच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून एमए (सार्वजनिक व्यवस्थापन) पदवी दिली जाते.