Sunil Tatkare Birthday : शरद पवारांच्या मर्जीतला नेता ते राष्ट्रवादीचे 'नवे प्रदेशाध्यक्ष' जाणून घ्या सुनील तटकरेंचा राजकीय प्रवास...

Rashmi Mane

सुनिल तटकरे

कोकणात राष्ट्रवादी काँग्रेसची पाळेमुळे रोवण्यात यांचे महत्त्वपूर्ण योगदान असणाऱ्या सुनील तटकरे याचा आज वाढदिवस.

Sunil Tatkare | Sarkarnama

महत्त्वाच्या जबाबदाऱ्या

सुसंस्कृत, अभ्यासू वृत्ती आणि लोकांच्या समस्यां सोडविण्यासाठी तत्पर असणाऱ्या सुनील तटकरे यांनी आजपर्यंत राष्ट्रवादीत संघटना पातळीवर अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. 

Sunil Tatkare | Sarkarnama

प्रमुख नेत्यांपैकी एक

आजही महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांमध्ये सुनील तटकरे यांचे नाव आवर्जून घेतले जाते.

Sunil Tatkare | Sarkarnama

जन्म

सुनील तटकरे यांचा जन्म 10 जुलै 1955 रोजी रायगडमधील कोलाड येथे झाला.

Sunil Tatkare | Sarkarnama

शिक्षण

तटकरे यांनी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी इंटर सायन्सचे शिक्षण घेतले.

Sunil Tatkare | Sarkarnama

कंत्राटदार म्हणून व्यवसाय

सुनील तटकरे यांनी काही काळ सरकारी कंत्राटदार म्हणून व्यवसाय केला. त्यानंतर 1984 साली तटकरे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Sunil Tatkare | Sarkarnama

लहानपणापासूनच राजकारणाचा बाळकडू

सुनील तटकरे यांना लहानपणापासूनच राजकारणाचा बाळकडू मिळला. त्यांचे वडील दत्ताजी तटकरे हे काँग्रेसमध्ये सक्रिय होते. त्यामुळे सहाजिकच त्यांना राजकारणात रस होता.

Sunil Tatkare | Sarkarnama

पाच दशकापासून राजकारणात

जवळपास गेल्या पाच दशकांपासून रोह्यासह रायगड परिसरातील राजकारणात तटकरे कुटुंबीय सक्रिय आहेत. 

Sunil Tatkare | Sarkarnama

तटकरे कुटुंबातील पुढची पिढी

अदिती तटकरे आणि अनिकेत तटकरे यांच्या रुपाने आता तटकरे घराण्याची पुढची पिढीही राजकारणात सक्रिय झाली आहे.

Sunil Tatkare | SArkarnama

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रविवारी (2 जुलै) ला झालेल्या बंडखोरीनंतर सुनिल तटकरे अजित पवार गटात सामील झाले आहेत. त्यानंतर अजित पवारांनी तटकरे यांना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष केले आहे.

Sunil Tatkare | SArkarnama

Next : सत्तेच्या महासंग्रामामुळे देशातल्या 'या' राजकीय कुटुंबात पडलीये फूट !

येथे क्लिक करा