सरकारनामा ब्यूरों
उत्तराखंड डेहराडूनच्या तस्किन खान हिने UPSC 2022 च्या परीक्षेत 736 व्या क्रमांकासह उत्तीर्ण केली आहे. ती एक सोशल मीडिया स्टार आहे ज्याचे बरेच फॉलोअर्स आहेत.
2016-17 मध्ये तस्किनने मिस डेहराडून आणि मिस उत्तराखंडचा किताब पटकावला. मिस इंडिया होण्याचे तिचे स्वप्न होते. मात्र तिने UPSC परिक्षेत यश मिळवले.
तीन प्रयत्नात अपयशी झाल्यानंतर तिने संयम आणि मेहनतीने चौथ्या प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण केली.
शालेय शिक्षणानंतर तस्किनने एनआयटी प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली. मात्र फी भरण्यासाठी पालकांकडे पैसे नव्हते, अशी आठवण ही तस्किन सांगते.
तस्किनचे वडील आफताब खान, आई शाहीन खान आणि धाकटी बहीण अलीजा खान हे मेरठमध्ये राहतात. तस्किनची इच्छा आयएएस होण्याची होती आणि दुसरा पर्याय तिने भारतीय परराष्ट्र सेवा असे ठेवले आहे.
तस्किन खानला 2020 मध्ये जामिया मिलिया इस्लामियाच्या मोफत कोचिंगसाठी प्रवेश मिळाला. घरच्या प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमध्ये तिने UPSC परीक्षेत यश मिळविले.