Lok Sabha Election 2024 : 1951 ते 2019 पर्यंतच्या लोकसभा निवडणुकीत तब्बल 'इतक्या' हजार उमेदवारांचं डिपॉझिट जप्त

Akshay Sabale

डिपॉझिट अर्थात अनामत रक्कम -

देशात ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत निवडणुका होत असतात. कोणतीही निवडणूक लढण्यासाठी उमेदवारांना आयोगाकडे डिपॉझिट अर्थात अनामत रक्कम जमा करावी लागते.

representative photo | sarkarnama

कमी मते पडल्यास डिपॉझिट जप्त -

निवडणुकीत एकूण मतांच्या सुमारे 16.66 (1/6) टक्क्यांपेक्षा कमी मते पडल्यास डिपॉझिट जप्त होते.

representative photo | sarakrnama

आकडा थक्क करणारा -

पहिल्या लोकसभा निवडणुकीपासून 2019 च्या लोकसभेपर्यंत डिपॉझिट जप्त झालेल्या उमेदवारांचा आकडा थक्क करणारा आहे.

representative photo | sarkarnama

71 हजार जणांचं डिपॉझिट जप्त -

1951 ते 2019 दरम्यान 91 हजार 160 उमेदवारांनी लोकसभेसाठी नशीब आजमावलं आहे. मात्र, तब्बल 71 हजार 246 जणांना आपलं डिपॉझिट वाचवता आलं नाही.

representative photo | sarkarnama

745 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त -

देशात पहिली लोकसभा निवडणूक 1951-52 मध्ये झाली. तेव्हा, 1 हजार 874 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यातील 745 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते.

representative photo | sarkarnama

51 जणांचे डिपॉझिट जप्त -

2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे 436 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात होते. त्यातील 51 जणांचे डिपॉझिट जप्त झाले होते.

narendra modi | sarkarnama

148 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त -

काँग्रेसचे 421 उमेदवारांनी नशिब आजमावलं होतं. त्यातील तब्बल 148 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालेले.

rahul gandhi | sarkarnama

41 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त -

बहुजन समाजवादी पक्षाच्या 345 आणि कम्युनिस्ट पक्षाच्या 49 पैकी 41 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं होतं.

R

mayavati | sarkarnama

NEXT : भारतातील 'टाॅप' राजकीय पक्षांची स्थापना 'या' वर्षी झाली...

Top National Parties In India | sarkarnama
क्लिक करा...