Akshay Sabale
नागपूर लोकसभा मतदार संघातून काँग्रेसनं आमदार विकास ठाकरे यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात मैदानात उतरवलं आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करताना विकास ठाकरे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात संपत्तीची माहिती दिली आहे. साडेचार वर्षात विकास ठाकरे यांच्या संपत्तीत तब्बल 63 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
2019 मध्ये विकास ठाकरे आणि त्यांच्या पत्नीची मिळून 6 कोटी 18 लाख 11 हजार 330 रूपयांची चल-अचल संपत्ती होती.
2024 मध्ये आमदार विकास ठाकरे आणि त्यांच्या पत्नीच्या चल-अचल संपत्तीत वाढ होऊन 10 कोटी 7 लाख 56 हजार 481 झाली आहे.
2019 मध्ये ठाकरे पती-पत्नीवर 87 लाख 21 हजार 849 रूपयांचं कर्ज होतं. सध्या त्यांच्यावर 2 कोटी 92 लाख 58 हजार 69 रकमेचं कर्ज आहे.
2018-19 मध्ये ठाकरे पती-पत्नी वार्षिक उत्पन्न 15 लाख 76 हजार 66 रूपये इतके होते. 2022-23 मध्ये हा आकडा वाढून 50 लाख 32 हजार 930 रूपये झाला आहे.
ठाकरेंकडे 1 कोटी 2 लाख 52 हजार रूपये किमतीची वाहने आहेत. त्यात 72 लाखांची कार विकास ठाकरेंच्या नावावर आहे.
विकास ठाकरेंविरोधात चार विविध प्रकारचे गुन्हे दाखल असून ते सर्व राजकीय स्वरूपचे आहेत.