PM Narendra Modi : गंगा किनारी आरती, भैरव दर्शन अन् शक्तीप्रदर्शन..! पंतप्रधान मोदींनी दाखल केला उमेदवारी अर्ज

Rajanand More

अर्ज दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (ता. १४ मे) वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला.

PM Narendra Modi | sarkarnama

तिसऱ्यांदा मैदानात

वाराणसी मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. मागील दोन निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराचा दारूण पराभव करत विजय मिळवला.

PM Narendra Modi | sarkarnama

गणेश्वर शास्त्रींची उपस्थिती

अर्ज दाखल करताना पंडित गणेश्वर शास्त्री मोदींसोबत होते. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित.

PM Narendra Modi | sarkarnama

गंगा किनारी आरती

अर्ज दाखल करण्यापुर्वी गंगा नदी किनारी दशाश्वमेध घाटावर पूजा केली. वैदिक मंत्रोच्चारात आरतीही केली.

PM Narendra Modi | Sarkarnama

भैरवाचे दर्शन

भैरव मंदिरात जाऊ दर्शन घेतले. मंदिरातून ते थेट निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात दाखल झाले.

PM Narendra Modi | Sarkarnama

शक्तीप्रदर्शन

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भाजपची सत्ता असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री, अनेक केंद्रीय मंत्री, मित्रपक्षांचे नेते वाराणसीमध्ये उपस्थित होते.

PM Narendra Modi | Sarkarnama

रोड शो

पंतप्रधान मोदींनी अर्ज दाखल करण्यापुर्वी सोमवारी वाराणसीमध्ये रोड शो केला. यावेळी मोठी गर्दी झाली होती.

PM Narendra Modi | Sarkarnama

एकतर्फी निवडणूक

वाराणसी मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला असून पंतप्रधान मोदींची मोठी लोकप्रियता आहे. त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी मानली जाते.

PM Narendra Modi | Sarkarnama

NEXT : वाराणसी झाली 'मोदी'मय, भव्य रोड शो!