Narendra Modi News : RBI ला सल्ला, ए-आय तंत्रज्ञान अन् पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत; मोदींच्या भाषणातील 10 मुद्दे

Akshay Sabale

मोदी मुंबई दौऱ्यावर -

आरबीआयच्या 90 व्या वर्धापनदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दौऱ्यावर होते. या वेळी पंतप्रधानांनी पुन्हा सत्तेत येण्याचं संकेत दिलेत. त्या भाषणातील काही मुद्दे जाणून घेणार आहोत...

Narendra Modi | sarkarnama

100 दिवस निवडणुकीत व्यस्त -

आरबीआयनं शंभर दिवसांत त्यांचा रोड मॅप तयार करावा. पुढील 100 दिवस पंतप्रधान निवडणुकीत व्यस्त असल्यानं त्या दिवसांचा वापर आरबीआयनं करावा.

Narendra Modi | sarkarnama

PM च्या शपथेनंतर काम येतील -

पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून तुमच्याकडे धमा-धम काम येतील, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

Narendra Modi | sarkarnama

तरुणांना नवी संधी -

सरकारच्या धोरणामुळे गेल्या 10 वर्षांत नवीन क्षेत्रे निर्माण झाली आहेत. देशातील तरुणांना नवीन संधी मिळत आहेत.

Narendra Modi | sarkarnama

तंत्रज्ञान मोठी ताकद -

आज सरकार हरित ऊर्जा, सौर ऊर्जा आणि हरित हायड्रोजन यांसारख्या उदयोन्मुख क्षेत्रांची व्याप्ती वाढवत आहे. डिजिटल तंत्रज्ञान मोठी ताकद दिली जात आहे.

Narendra Modi | sarkarnama

भारत समजून घ्यायचा आहे -

देशात पर्यटन क्षेत्रही वाढत आहे आणि संपूर्ण जगाला भारतात यायचे आहे, भारत बघायचा आहे, भारत समजून घ्यायचा आहे. अयोध्या धार्मिक पर्यटनाची जगातील राजधानी होण्याचे भाकीत मोदींनी व्यक्त केले.

Narendra Modi | sarkarnama

पर्यटन क्षेत्र -

पर्यटन या क्षेत्राला आर्थिक पाठबळ देण्यासाठी आपली तयारी सुनिश्चित करावी लागणार असल्याचे मोदी म्हणाले.

Narendra Modi | sarkarnama

खासगी कर्ज GDP च्या 2 पट -

जगात आपला रुपया स्वीकारला गेला पाहिजे. अनेक देशांचे खासगी क्षेत्रातील कर्ज त्यांच्या जीडीपीच्या 2 पट झाले आहे.

Narendra Modi | sarkarnama

RBI नं अभ्यास करायला हवा -

अनेक देशांच्या या धोरणामुळे संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होतो. याचाही अभ्यास रिझर्व्ह बँकेने करायला हवा, असा सल्ला मोदींनी दिला

Narendra Modi | sarkarnama

बदल स्वीकारण्याची गरज -

जगात 'ए आय' आणि ब्लॉकचेनसारख्या नवीन तंत्रज्ञानाने बँकिंग प्रणाली बदलली आहे. आपण हा बदल स्वीकारण्याची गरज आहे.

Narendra Modi | sarkarnama

RBI ची कौतुकास पात्र भूमिका -

आरबीआयनं गेल्या दहा वर्षांत भारताच्या बँकिंग प्रणाली आणि अर्थव्यवस्थेच्या परिवर्तनामध्ये कौतुकास पात्र भूमिका बजावली आहे, असंही पंतप्रधानांनी म्हटलं.

R.

Narendra Modi | sarkarnama