Rashmi Mane
आपल्या वडिलांचा वारसा पुढे नेणारी अनेक राजकीय कुटुंबं देशात आहेत, पण अंजली बिर्ला याला अपवाद आहेत.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या मुली राजकारणापासून अलिप्त आहेत. त्यांच्या दोन्ही मुलींनी वेगळा मार्ग निवडला आहे.
ओम बिर्ला यांची मोठी मुलगी चार्टर्ड अकाउंटंट, तर धाकटी मुलगी अंजली बिर्ला हिने प्रशासकीय सेवेचा मार्ग निवडला आहे.
अंजलीने नवी दिल्लीच्या रामजस कॉलेजमधून राज्यशास्त्रात पदवी घेतली आहे. त्यानंतरच अंजलीने यूपीएससीची तयारी सुरू केली.
'अन्या फाउंडेशन' आणि 'पौधा हरी' या एनजीओ चालवत आहे. अन्याच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण आणि वनस्पती हिरवळीच्या माध्यमातून पर्यावरण या विषयांवर काम केले जाते.
अंजली यूपीएससी परीक्षेची तयारी करताना 10 ते 12 तास अभ्यास करायच्या.
दहावीमध्ये असतानाच त्यांनी प्रशासकीय सेवेत काम करण्याचे ध्येय निश्चित केले होते.
R