Loksabha Election : मतदारांना ग्रीन कार्पेट, हरीत मतदान केंद्र, नेमका काय संदेश?

Roshan More

ग्रीन कार्पेट

मतदानासाठी मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदारांसाठी ग्रीन कार्पेट टाकण्यात आले आहे.

green polling station | sarkarnama

पीसीएमसीचा पुढाकार

पिंपरी चिंचवड महानगपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्या संकल्पनेतून महानपालिकेच्या उद्यान विभागाने मतदारांच्या माध्यमातून पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी हरीत मतदान केंद्र उपक्रम राबविला आहे.

green polling station | sarkarnama

ही आहेत हरित मतदान केंद्र

पिंपरी चिंचवड शहरातील पी. के. इंटरनॅशनल स्कूल पिंपळे सौदागर, एनसीआरडी स्टर्लिंग स्कूल भोसरी, ज्ञानप्रबोधिनी शाळा निगडी, डी. वाय. पाटील ज्युनियर कॉलेज शाहूनगर येथे असलेल्या लोकसभा मतदार संघाच्या मतदान केंद्रावर संकल्पित चार हरीत मतदान केंद्र साकारण्यात आली आहेत.

green polling station | sarkarnama

रोपांचे वाटप होणार

या मतदान केंद्रावर मतदारांना नक्षत्र वाटिका, १४२ आयुर्वेदिक वनस्पती, देशी वृक्षांच्या बीजांचे वाटप, मतदारांना प्रोत्साहनपूरक रोपांचे वाटप करण्यात येणार आहे.

green polling station | sarkarnama

वृक्ष संवर्धनाचा संदेश

आज आहे मतदानाचा सण चला करूया वृक्ष संवर्धन असा संदेश मतदारांना देण्यात येणार आहे.

green polling station | sarkarnama

सेल्फी पाईंट

पुणे मतदारसंघात मतदारांसाठी सेल्फी पाईंट उभारण्यात आले आहे.

polling station | sarkarnama

रांगोळ्या

शिरुर लोकसभा मतदारसंघात मतदानकेंद्रा बाहेर रांगोळ्या काढण्यात आल्या आहेत.

polling station | sarkarnama

NEXT: महाराष्ट्रातील ‘या’ दिग्गज नेत्यांसाठी चौथ्या टप्प्यात मतदान...

Chandrakant Khaire, Sandipan Bhumre Imtiaz Jalil | sarkarnama