सर्वाधिक कार्यकाळ! मोदींच्या नावावर आधीच जमा झालेत अनेक विक्रम

Amit Ujagare

इंदिरा गांधींचा विक्रम मोडला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा सर्वाधिक पंतप्रधानपदावर राहण्याचा विक्रम मोडला आहे.

Indira Gandhi

सलग अकरा वर्षे

1966-77 ही सलग अकरा वर्षे आणि त्यानंतर १९८०-८४ ही पाच वर्षे असे एकूण १६ वर्षे इंदिरा गांधींनी पंतप्रधान म्हणून काम पाहिलं. पण मोदी २०१४-२५ असं सलग ११ वर्षे ६० दिवस पंतप्रधान राहिले आहेत.

Narendra Modi

नेहरुंचा विक्रम मोडणार

यानंतर आता पहिले पंतप्रधान म्हणून पंडीत नेहरू हे १९४७-६४ अशी सलग १६ वर्षे (२८६ दिवस) पंतप्रधान राहिले आहेत. त्यामुळं मोदींना आता २०२९ ची निवडणूक जिंकली तर ते नेहरुंचा विक्रम मोडतील.

Jawaharlal Nehru

मोदींनी अनेक विक्रम मोडले

पण मोदींनी यापूर्वीच जनतेनं निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीनं सर्वाधिक काळ प्रमुखपद भूषवल्याचे अनेक विक्रम मोडले आहेत. मोदी हे स्वातंत्र्यानंतर जन्मलेले आणि सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिलेले एकमेव व्यक्ती आहेत.

Narendra Modi

२४ वर्षे प्रमुखपदी काम

तसंच सलग २४ वर्षे त्यांनी प्रमुखपदी काम केलं आहे. यामध्ये २००१ मध्ये ते पहिल्यांदा गुजरातचे मुख्यंमत्री बनले ते २०१४ पर्यंत कायम होते. त्यानंतर २०१४ पासून २०२४ पर्यंत ते पंतप्रधानपदी कायम आहेत.

Narendra Modi

पहिले बिगर काँग्रेसी नेते

त्याचबरोबर मोदी हे असे पहिले बिगर काँग्रेसी नेते आहेत जे सलग दोन टर्म पूर्ण कार्यकाळ पंतप्रधानपदी राहिले आहेत. मोदींपूर्वी भाजपच्या अटलबिहारी वाजपेयी हे तीनवेळा पंतप्रधान झाले पण एकूण ६ वर्षांचाच कार्यकाळ भोगला.

Atal Bihari Vajpayee

इतर पंतप्रधान

याशिवाय बिगर काँग्रेसी पंतप्रधान म्हणून मोरारजी देसाई, चरण सिंह, चंद्रशेखर, आय के गुजराल आणि एचडी दैवेगौडा यांचा छोटा कार्यकाळ राहिला आहे.

Deve Gauda

मोदींनंतर केवळ मनमोहन सिंग

पण यामध्ये गांधी घराण्यातला नसलेला पण पाच-पाच वर्षांची दोन टर्म पूर्ण करणारा मोदींनंतर आणखी एक पंतप्रधान आहे, ही व्यक्ती म्हणजे डॉ. मनमोहन सिंग.

Manmohan Singh