घरबसल्या व्यवसाय सुरू करायचा आहे? महिलांसाठी 5 सरकारी मदतीचे पर्याय

Amit Ujagare

प्रधानमंत्री मुद्रा योजना

या योजनेंतर्गत तारणमुक्त कर्ज मिळते. यामध्ये शिशू योजना ही सुरुवातीच्या स्तरावरील योजना असून यामध्ये ५०,००० रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध होते. त्यानंतर किशोर योजना असून त्यात ५०,००१ ते ५ लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळते तर तरुण/तरुण प्लस योजनेंतर्गत ५ लाख ते २० लाखांपर्यंत कर्ज मिळते.

Women Home business Schemes

ही योजना घरबसल्या व्यवसायासाठी उपयुक्त असून यामध्ये शिवणकाम, पापड, लोणची, मसाले उत्पादन तसंच ब्युटी पार्लर, हस्तकला, टिफिन/क्लाउड किचन, रिटेल इ. काम करता येऊ शकतात. यासाठी कोणत्याही बँक, पोस्ट ऑफिस, NBFC शाखेतून अर्ज करता येतो. किंवा udyamimitra.in/mudra.org.in या वेबसाईटवर Udyam नोंदणी करता येते.

Women Home business Schemes

प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम

या योजनेंतर्गत नवीन युनिटसाठी बँक कर्जावर अनुदान मिळतं. महिलांना विशेष श्रेणीतून शहरी भागात २५ टक्के आणि ग्रामीण भागात ३५ टक्के अनुदान दिलं जातं. यामध्ये स्वतःचं योगदान फक्त ५ टक्के आहे. यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग प्रकल्पाची खर्च मर्यादा ५० लाख रुपये तर सेवा प्रकल्पाची मर्यादा २० लाख रुपये आहे.

Women Home business Schemes

ही योजनाही घरबसल्या व्यवसायासाठी उपयुक्त असून अन्न प्रक्रिया, हस्तकला, कपडे, कॉटेज इंडस्ट्री असे छोटे व्यवसाय या योजनेतून करता येतात. या योजनेसाठी KVIC पोर्टलवर kviconline.gov.in/pmegp या लिंकवरुन अर्ज करता येतो किंवा जिल्हा उद्योग केंद्र (DIC) मार्फत EDP ट्रेनिंग अनिवार्य आहे.

Women Home business Schemes

दीनदयाल अंत्योदय योजना

या योजनेंतर्गत स्वयं सहाय्यता गटा मार्फत १५,००० ते ३०,००० रुपये इतका निधी मिळतो. हा कम्युनिटी इन्व्हेस्टमेंट फंड असतो. यामध्ये बँका तारणमुक्त, कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध करुन देतात. काही बँका केवळ ४ टक्के व्याजदरानं कर्ज उपलब्ध करुन देतात. यामध्ये पसर्नल लोनही उपलब्ध होऊ शकतं.

Women Home business Schemes

ही योजना घरबसल्या व्यवसायासाठी उपयुक्त असून यामध्ये शिवण, खाद्यपदार्थ, डेअरी, हस्तकला, लहान रिटेल व्यवसाय सुरु करता येऊ शकतात. यासाठी गावातील/ ब्लॉक स्तरावरील आजीविका मिशन कार्यालयात SHG मध्ये सामील व्हा किंवा नवीन गट तयार करा. याची सविस्तर माहिती aajeevika.gov.in वर उपलब्ध आहे.

Women Home business Schemes

SBI स्त्री शक्ती पॅकेज

या योजनेंतर्गत महिला उद्योजकांसाठी व्याजामध्ये सवलत मिळते साधारण ०.५० टक्क्यांपर्यंत ही सवलत असते. यामध्ये तारणमुक्त/सुलभ अटींवर कर्ज उपलब्ध होते. काही योजनांमध्ये अन्न व्यवसाय (अन्नपूर्णा) किंवा ब्युटी पार्लर (श्रृंगार) साठी विशेष अर्थसहाय्य केलं जातं. यासाठी SBI किंवा इतर सार्वजनिक बँकेत प्रोजेक्ट रिपोर्टसह अर्ज करता येतो.

Women Home business Schemes

छोटे उद्योग सुरु करण्यास इच्छुकांनी udyamregistration.gov.in वर मोफत नोंदणी करुन घ्यावी. यानंतर विविध योजनांचे अपडेट त्यांना मिळतात. तसंच राज्य सरकारी योजनांसाठी जिल्हा उद्योग केंद्र किंवा महिला व बाल विकास कार्यालयाशी संपर्क साधता येईल.

Women Home business Schemes

सामान्य टिप्स

प्रथम Udyam नोंदणी करा. व्यवसायाचा साधा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार ठेवा. आधार, पॅन, बँक खाते, रहिवासी पुरावा आवश्यक. अपडेटेड माहितीसाठी अधिकृत वेबसाइट्स (mudra.org.in, kviconline.gov.in, aajeevika.gov.in) किंवा जवळच्या बँक/DIC/ब्लॉक कार्यालयात चौकशी करा.

Women Home business Schemes