Rashmi Mane
पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने लष्कर, नौदल आणि वायुदल यांच्या संयुक्त कारवाईत पाकिस्तानमधील 9 दहशतवादी ठिकाणांवर हल्ला करण्यात आला, ज्यात 80-90 दहशतवाद्यांचा खात्मा झाला.
लेफ्टिनंट कर्नल सोफिया कुरैशी यांनी विंग कमांडर व्योमिका सिंग आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांच्यासोबत संयुक्त प्रेस कॉन्फरन्समध्ये 'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती दिली.
कर्नल सोफिया कुरेशी, ज्या मूळच्या गुजरातच्या आहेत, त्या कॉर्प्स ऑफ सिग्नल्समधून आहेत. बायो-केमिस्ट्रीमध्ये पदव्युत्तर पदवी घेतलेल्या कर्नल सोफियाचे आजोबाही सैन्यात होते.
2006 मध्ये, त्यांनी काँगोमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेत लष्करी निरीक्षक म्हणून काम केले आहे.
1999 साली, वयाच्या 17 व्या वर्षी, त्यांनी शॉर्ट सर्व्हिस कमिशनद्वारे भारतीय सैन्यात प्रवेश केला. त्या सिग्नल कॉर्प्समध्ये अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
त्यांनी दक्षिण आफ्रिकेत सिव्हिल-मिलिटरी कोऑर्डिनेशन प्रशिक्षणात महिलांना प्रशिक्षित करणाऱ्या पहिल्या महिला प्रशिक्षक म्हणून काम केले.
त्या पंजाब सीमेवर 'ऑपरेशन पराक्रम' मध्ये सहभागी होत्या, ज्यासाठी त्यांना जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ यांच्याकडून प्रशस्तिपत्र मिळाले.
उत्तर पूर्व भारतातील पूरग्रस्त भागात मदत कार्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, ज्यासाठी त्यांना सिग्नल ऑफिसर इन चीफ यांच्याकडून प्रशस्तिपत्र प्राप्त झाले