Jagdish Patil
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे.
निवडणुकीसाठी मतदान करताना आपल्याकडे मतदान कार्ड असणं आवश्यक असतं.
मात्र तुमच्याकडे ते कार्ड नसले तरी तुम्ही डिजिटल व्होटर आयडी दाखवून मतदानाचा हक्क बजावू शकता.
तर हे डिजिटल व्होटर आयडी कसं डाऊनलोड करायचं? ते जाणून घेऊया.
सर्वात आधी तुम्हाला https://eci.gov.in/e-epic/ या निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल.
पहिल्यांदाच या वेबसाईटवर आला असाल तर तुम्ही तुमच्या मोबाईल नंबरद्वारे निवडणूक आयोगाच्या पोर्टलवर नोंदणी करू शकता.
मोबाईल नंबरची नोंदणी केल्यानंतर 'डाउनलोड इ-एपिक' या पर्यायावर क्लिक करा.
एपिक नंबरवर म्हणजेच व्होटर आयडीवर असणारा युनिक आयडी नंबर सबमिट करा.
त्यानंतर तुमचे डिजिटल व्होटर आयडी डाऊनलोड करण्याचा पर्याय येईल त्यानंतर तुम्ही ते सेव्ह करून ठेवू शकता.