Jagdish Patil
विधानसभा निवडणुकीत महायुतीने जोरदार मुसंडी मारत तब्बल 230 जागा जिंकल्या आहेत.
या निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय झाला असून एकट्या भाजपने 130 जागा मिळवल्या आहेत.
महायुतीच्या या विजयात PM मोदी यांच्यासह अनेक राष्ट्रीय नेत्यांचा मोलाचा वाटा आहे.
PM मोदींनी युतीसाठी राज्यात 10 सभा घेतल्या तर गृहमंत्री अमित शहांनी देखील महाराष्ट्र पिंजून काढला.
योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रात 15 प्रचार सभा घेतल्या. त्यांनी दिलेली 'बटेंगे तो कटेंगे' ही घोषणा चांगलीच चर्चेत होती.
सोलापुरात माधवी लता या भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी आल्या होत्या. यावेळी त्यांनी धनुष्यबाण मारतानाची कृती करत त्यांनी उपस्थितांची मनं जिंकली.
केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही युतीसाठी सभा घेतली.
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे देखील महायुतीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात आले होते.
भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी मोठा रोड शो केला.