Rashmi Mane
राज्यात विधानसभा निवणुकीच्या मतदानाला सुरूवात झालीये.
गेल्या एक महिन्यापासून राज्यभर जोरदार निवडणूक प्रचार होतांना दिसत होता.
आज राज्यभरात विधानसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे.
आज सकाळपासून राज्यातील प्रमुख नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावला.
यावेळेस राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीत चुरशीची लढत होतांना पाहायला मिळणार आहे.
राज्यातील जनता आता कोणत्या पक्षाला पसंती देते हे येत्या 23 तारखेला स्पष्ट होईल.
आज सकाळीच मतदान केंद्रावर नागरिकांची मतदानासाठी मोठी गर्दी बघायला मिळतंय.
प्रशासनाकडूनही मतदान सुरळीत व्हावं यासाठी जोरदार तयारी केली गेलीये. मतदानाचा हक्क बजावा आपले कर्तव्य पार पाडा, असे प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन केले जातंय.