Rajanand More
शिरपूर मतदारसंघातून भाजपचे काशीराम पावरा यांनी तब्बल 1 लाख 45 हजार 944 मतांनी विजय प्राप्त केला आहे. त्यांनी अपक्ष उमेदवार जितेंद्र ठाकूर यांचा पराभव केला. पावरा यांना 1 लाख 78 हजार 73 मते मिळाली.
भाजपचे सातारा मतदारसंघातील उमेदवार शिवेंद्रराजे भोसले 1 लाख 42 हजार 124 मताधिक्याने विजयी. त्यांच्या विरोधातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अमित कदम यांना केवळ 34 हजार 725 मते मिळाली.
धनंजय मुंडे परळी मतदारसंघातून 1 लाख 41 हजार 241 मताधिक्याने विजयी. त्यांना 1 लाख 94 हजार 889 मते मिळाली आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेसाहेब देशमुख पराभूत.
भाजपचे बागलाण मतदारसंघातील उमदवार दिलीप बोरसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या दीपिका चव्हाण यांचा तब्बल 1 लाख 29 हजार 297 मतांनी पराभव केला. बोरसे यांना 1 लाख 59 हजार 681 मते मिळाली आहेत.
कोपरगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आशुतोष काळे 1 लाख 24 हजार 624 मतांनी विजयी. त्यांना 1 लाख 61 हजार 147 मते मिळाली असून त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे संदीप वरपे यांचा पराभव केला.
कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 1 लाख 20 हजार 717 मतांनी विजयी. त्यांनी उध्दव ठाकरेंच्या सेनेचे केदार दिघे यांचा पराभव केला. शिंदेंना 1 लाख 59 हजार 60 मते मिळाली.
नागपूर पूर्व मतदारसंघातून भाजपचे कृष्णा खोपडे 1 लाख 63 हजार 390 मते मिळवत विजयी झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दुनेश्वर पेठे यांचा तब्बल 1 लाख 15 हजार 288 मतांनी पराभव केला.
भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी कोथरुड मतदारसंघात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत मोकाटे यांचा 1 लाख 12 हजार 41 मतांनी पराभव केला. पाटलांना 1 लाख 59 हजार 234 मते मिळाली.
मावळ मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार सुनिल शेळके यांचा 1 लाख 8 हजार 565 मताधिक्याने विजय. त्यांनी अपक्ष बापू भेगडे यांना पराभूत करताना 1 लाख 91 हजार 255 मते मिळवली.
भाजपचे मेळघाट मतदारसंघातील उमेदवार केवलराम काळे यांनी 1 लाख 6 हजार 859 मतांनी विजयश्री खेचून आणली आहे. त्यांच्या विरोधातील काँग्रेसचे उमेदवार हेमंत चिमोटे यांना केवळ 39 हजार 119 मते मिळाली.