Rashmi Mane
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर महायुती पुन्हा सत्ता स्थापन करणार हे निश्चित झालं.
पण त्यातही मुख्यमंत्रीपदावर कोण बसणार? याची आता मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
26 नोव्हेंबरला विधानसभेची मुदत संपल्याने एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्त केला. तसेच नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईपर्यंत राज्यपालांवर काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सोपवली.
त्यामुळे निवडणुकींचे निकाल लागले तरीही मुख्यमंत्रीपद हा विषय महाराष्ट्रात चर्चेत राहिला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याला आजतागायत सगल सर्वाधिक काळ लाभलेले मुख्यमंत्री कोण होते? हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरते.
महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्रीपदाच्या खूर्चीवर सर्वाधिक काळ वसंतराव नाईक राहिले आहेत.
महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे जनक वसंतराव फुलसिंग नाईक हे प्रख्यात कृषीतज्ञ, प्रगतशील शेतकरी व राजनितीज्ञ होते.
वसंतराव नाईक यांनी 5 डिसेंबर 1963 ते 21 फेब्रुवारी 1975 असं तब्बल 11 वर्षं 78 दिवस सलग मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे.
आता मुख्यमंत्री पदाच्या खूर्चीत कोण विराजमान होतं? आणि हा रेकॉर्ड कोण मोडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.