Aslam Shanedivan
राज्यातील शिष्यवृत्ती परीक्षेत बदल करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सध्या ही परीक्षा इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी लागू आहे
पण आता पुढील वर्षापासून यात बदल होणार असून नव्या निर्णायाप्रमाणे ही परीक्षा पुर्वीप्रमाणे इयत्ता चौथी आणि इयत्ता सातवीमध्ये घेण्यात येणार आहे.
याची अंमलबजावणी 2025-26 या शैक्षणिक सत्रापासून होणार असून इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन फेब्रुवारी 2026 च्या दुसऱ्या अथवा तिसऱ्या रविवारी करण्यात येणार आहे.
तर इयत्ता चौथी आणि इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन साधारणतः एप्रिल किंवा मे 2026 च्या कोणत्याही रविवारी करण्यात येईल.
तर 2026-27 पासून पुढे इयत्ता चौथी इयत्ता सातवी मध्ये नियमितपणे शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन करण्यात येईल.
इयत्ता चौथीसाठी प्रतिवर्षी पाच हजार रुपये तर इयत्ता सातवीसाठी प्रतिवर्षी सात हजार पाचशे रुपये शिष्यवृत्तीची रक्कम मंजूर करण्यात आली आहे.
इयत्ता चौथी व इयत्ता पाचवीकरिता प्रत्येकी 16,693 आणि इयत्ता सातवी आणि इयत्ता आठवी करिता प्रत्येकी 16,588 शिष्यवृत्ती संच मंजूर राहतील.