Rashmi Mane
सरकारी कामासाठी लागणारे महिने–महिन्यांचे फेरे आता संपणार! सरकारने घेतला डिजिटल युगाशी सुसंगत मोठा निर्णय.
'सरकारी काम आता जलद कारण शासकीय सेवा आता थेट तुमच्या मोबाईलवर – व्हॉट्सअॅपवर उपलब्ध होणार आहे.
‘आपले सरकार’ पोर्टलवरील सर्व सेवा व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून सुरू होणार. घरबसल्या अर्ज, कागदपत्रे आणि सेवा मिळवणे झाले सोपे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांना पारदर्शक, जलद आणि सुलभ सेवा देण्यावर भर.
राज्यातील 1001 शासकीय सेवा ‘आपले सरकार’ पोर्टलवर. यातील 997 सेवा सध्या ऑनलाइन सुरू आहेत.
गेल्या 15 दिवसांत 236 नवीन सेवांची भर. आता त्या सर्व सेवांचा लाभ व्हॉट्सअॅपवरही घेता येणार.
शासकीय कार्यालयात जाण्याची गरज नाही. घरबसल्या अर्ज व कागदपत्रे मिळवणे शक्य.
डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढवने आणि सर्वसामान्यांपर्यंत सेवा अधिक सोप्या पद्धतीने पोहोचवणे हा शासनाचा उद्देश आहे.