Farmers Insurance Scheme : नुकसानीची चिंता नाही! सरकारकडून आंबा शेतकऱ्यांना मिळणार जबरदस्त विमा कवच; अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे!

Rashmi Mane

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी!

राज्य सरकारकडून आंबा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा, नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षणासाठी ‘आंबा फळपीक विमा योजना’ लागू झाली आहे.

आंबा पिकाचे संरक्षण

अनियमित पाऊस, तापमानातील बदल, वादळ आणि गारपीट यामुळे होणाऱ्या नुकसानीवर आता विमा कवच मिळणार आहे.

कोण करू शकतो अर्ज?

ही योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक असून, विमा नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी राष्ट्रीय पीक विमा पोर्टल www.pmfby.gov.in वर नोंदणी करणे आवश्यक आहे.

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

  • अॅग्री स्टॅक नोंदणी

  • आधार कार्ड

  • बँक तपशील

  • जमीन धारणा उतारा

  • जिओ टॅग फोटो

  • ई-पीक पाहणी अहवाल

विम्यासाठी पात्र

या योजनेत सहभागासाठी किमान क्षेत्र 20 गुंठे तर जास्तीत जास्त मर्यादा 4 हेक्टर इतकी निश्चित करण्यात आली आहे. केवळ उत्पादनक्षम (फळ देणाऱ्या) फळबागांनाच विमा संरक्षण लागू राहील.

विमा संरक्षणाची रक्कम

आंबा पिकासाठी अवेळी पाऊस, तापमानातील बदल, वादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तींविरुद्ध प्रति हेक्टरी 1,40,000 विमा संरक्षण उपलब्ध असून, त्यासाठी शेतकऱ्यांना 15,400 रुपयाचा हप्ता भरावा लागेल. तसेच गारपिटीसाठी स्वतंत्र विमा संरक्षण 46,000 प्रति हेक्टरी देण्यात आले आहे, ज्यासाठी शेतकऱ्यांना 9,333 हप्ता द्यावा लागेल.

कोणते धोके कव्हर होतील?

अवेळी पाऊस
तापमानातील मोठे बदल
वादळ
गारपीट
सर्व हवामान जोखमींवर आर्थिक संरक्षण!

Next : सरकार देतंय 5 लाख रुपयांचं आरोग्य कवच! तुमचं नाव लिस्टमध्ये आहे का ते लगेच तपासा!

येथे क्लिक करा