सरकारनामा ब्यूरो
यूपीएससीच्या पहिल्याच प्रयत्नात यश मिळवणारे IAS विजय अमृता कुलंगे हे अहमदनगर जिल्ह्यातील राळेगण या छोट्याशा गावातील आहेत.
शिंपी अन् शेतात रोजंदारीवर काम करणाऱ्या कष्टकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता.
सतत आपल्या दोन मुलांच्या शिक्षणाची काळजी करणाऱ्या या पालकांना दिवसाला जेमतेम 200 रुपये मिळत होते.
ही परिस्थिती बदलून असे काहीतरी करावे की, आपल्या पालकांना अभिमान वाटावा, अशी तीव्र इच्छा त्यांनी मनात बाळगली.
विजय हे एक वाचनप्रेमी अन् अभ्यासू असल्याने शाळेत नेहमीच अव्वल कामगिरी करत. त्यामुळे दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेत त्यांनी चांगले गुण मिळवले.
गरीब कुटुंब आणि दुष्काळी गावात डॉक्टर बनून वंचितांची सेवा करण्याचा निर्णय घेतला. मात्र, आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना एमबीबीएसचे स्वप्न सोडावे लागले.
डिप्लोमा इन एज्युकेशन (D.Ed) पूर्ण केले आणि नेवासा तालुक्यातील एका सरकारी शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून ते रुजू झाले. ज्यामुळे त्यांची आर्थिक चिंता दूर झाली.
तिसऱ्या प्रयत्नात MPSC ची परीक्षा उत्तीर्ण करत अहमदनगरमध्ये विक्रीकर निरीक्षक पद, तर UPSC च्या पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होत ते IAS अधिकारी झाले.