Rashmi Mane
मीरा चढ्ढा बोरवणकर या महाराष्ट्र केडरमधील पहिल्या महिला IPS अधिकारी आहेत. त्यांच्यावर 'मर्दानी' हा चित्रपट तयार झाला.
महाराष्ट्रातील 'लेडी सिंघम' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अर्चना त्यागी यांच्यावर 'मर्दानी- 2' हा चित्रपट तयार झाला आहे. त्यांगी यांनी बालगुन्हेगारीमध्ये विशेष काम केले आहे.
एक कणखर आणि डॅशिंग पोलिस अधिकारी म्हणून नेहमीच औरंगाबादच्या पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्याकडे पाहिलं जातं. 'लेडी सिंघम' या नावाने त्या प्रसिद्ध आहेत.
महाराष्ट्रातील अनेक महिलांनी मेहनतीच्या जोरावर आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. त्यातीलच एक नाव म्हणजे 'आयपीएस' अधिकारी तेजस्वी सातपुते. सध्या त्या मुंबईत डीसीपी या पदावर आहेत.
स्त्रीरोग तज्ज्ञ असणाऱ्या डॉ. आरती सिंग, दवाखान्यात काम करत असताना "मुलगी झाली, की मुलगा झाला," या प्रश्नाला कंटाळून त्यांनी लोकांची विचारसरणी बदलण्यासाठी. 2006 मध्ये, आयपीएसची परीक्षा उत्तीर्ण केली.
प्रसिद्ध महिला 'आयपीएस' अधिकारी ज्योतिप्रिया सिंग या 'दबंग' महिला अधिकारी म्हणून ओळखल्या जातात.
नागपूरच्या 'केंद्रीय तपास ब्युरोमध्ये पोलिस अधीक्षक' असणाऱ्या निर्मला देवी यांनी अनेक आव्हानांना तोंड देत 'आयपीएस' परीक्षा उत्तीर्ण केली.
नागपूर पोलिस उपायुक्त असणाऱ्या विनिता साहू. या 2010 च्या बॅचच्या 'आयपीएस' अधिकारी आहेत.