Ganesh Sonawane
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील वधू-वरांना विवाहासाठी आर्थिक मदत देण्यासाठी समाजकल्याण विभागाची योजना.
सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या पात्र जोडप्यांना प्रत्येकी २५ हजार रुपये अनुदान देण्याची तरतूद.
सामूहिक विवाह आयोजित करणाऱ्या पात्र स्वयंसेवी संस्थेला प्रत्येक जोडप्यामागे ४ हजार रुपये मिळतात.
वधू आणि वर दोघेही महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे.
वधू-वरांपैकी दोघे किंवा एकजण अनुसूचित जाती, नवबौद्ध अथवा पात्र प्रवर्गातील असणे आवश्यक आहे.
वधूचे वय किमान १८ आणि वराचे वय किमान २१ वर्षे पूर्ण असावे. दोघांचेही वय २८ वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
प्रथम विवाहासाठी लाभ मिळतो. निकषांनुसार विधवा महिलेलाही दुसऱ्या विवाहासाठी लाभ घेता येतो. आवश्यक प्रतिज्ञापत्र आणि जात प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत संस्थांनी विवाह सोहळ्याच्या किमान ३० दिवस आधी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नाशिक कार्यालयात प्रस्ताव सादर करावा.