महापौरपदाच्या चक्राकार आरक्षण सोडतीचा नियम काय? कशी असते प्रक्रिया?

Amit Ujagare

सोडत जाहीर

राज्यातील २९ महानगरपालिकेची आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. ही आरक्षण सोडत चक्राकार पद्धतीनं काढली जाते पण याबाबतचे नियम पाळले गेले नसल्याचा आरोप विरोधीपक्षांकडून केला जात आहे.

Pune

संविधानातील तरतूद

पण ही चक्राकार आरक्षण सोडत कशी काढली जाते या प्रक्रियेचा नियम काय आहे? संविधानात यामध्ये काय तरतूद आहे? जाणून घेऊयात.

Pimpri-Chinchwad

नगरविकास विभागाकडून सोडत

राज्यघटनेतील ७४ वी घटनादुरुस्ती आणि महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम यांतील नियमावलीनुसार महापौरपदाचं चक्राकार आरक्षणाची नगरविकास विभागाद्वारे सोडत काढली जाते.

Thane

आरक्षणाचा क्रमांक

यामध्ये अनुसुचित जाती (SC), अनुसुचित जमाती (ST), इतर मागास प्रवर्ग (OBC), महिला (Women) आणि सर्वसाधारण प्रवर्ग (Open) या क्रमानं आरक्षणाची सोडत काढली जाते.

nagpur

आरक्षणाची रचना

मागील उपलब्ध आरक्षणाच्या रेकॉर्डनुसार, त्या महापालिकेच्या आरक्षणाची रचना तयार केली जाते.

nashik

चिठ्ठ्यांद्वारे निवड

यामध्ये गेल्यावेळी संबंधित महापालिकेत महापौरपदासाठी जे आरक्षण लागू करण्यात आलं होतं. ते वगळून उर्वरित प्रवर्गाच्या चिठ्ठ्या तयार केल्या जातात.

Kalyan-Dombivali

सोडतीचा क्रम?

सर्वात आधी SC/ST प्रवर्गाची सोडत काढली जाते. त्यानंतर OBC प्रवर्गाची सोडत निघते.

Panvel

महिला आरक्षणाच्या चिठ्ठ्या

या सामाजिक आरक्षणाची सोडत निघाल्यानंतर महिलांसाठी ५० टक्के आरक्षणाच्या चिठ्ठ्या टाकल्या जातात.

Nanded

खुल्या प्रवर्गासाठी

त्यानंतर यामध्ये ज्या जागा शिल्लक राहतात त्या खुल्या प्रवर्गासाठी राखीव होतात.

Chandrapur

लॉटरी पद्धतच का?

या संपूर्ण प्रक्रियेवर आक्षेप घेतला जाऊ नये यासाठी लॉटरी पद्धतीनं ही आरक्षण सोडत घेतली जाते.

SambhajiNagar