Jagdish Patil
नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीच्या मतदानासाठी अवघा एक दिवस उरला असतानाच एक मोठी माहिती समोर आली आहे.
ती म्हणजे निवडणूक आयोगाने काही नगरपरिषदांची निवडणूक प्रक्रिया 20 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे.
यामध्ये बारामती, फलटण आणि महाबळेश्वर या नगरपरिषदांचा समावेश आहे.
उमेदवारी अर्ज भरण्यातील त्रुटी, न्यायालयीन याचिका अशा कारणांमुळे हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे.
बारामतीमध्ये नगराध्यक्षपदासह 7 प्रभागातील उमेदवारांविरोधात सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती.
ही याचिका न्यायालयाने फेटाळली मात्र अपिलाची मुदत संपली नसल्यामुळे बारामती नगरपरिषदेची निवडणूक प्रक्रिया 20 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे.
तर फलटण आणि महाबळेश्वर येथील मतदान अनुक्रमे 20 आणि 21 डिसेंबर रोजी होईल.
यवतमाळमधील दिग्रस, पांढरकवडा आणि वनी येथील काही प्रभागांची निवडणूकही तांत्रिक चुकांमुळे लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
या नव्या प्रक्रियेनुसार 4 डिसेंबर रोजी नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल.
त्यानुसार उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 10 डिसेंबर असेल. तर 20 डिसेंबर रोजी मतदान आणि 21 डिसेंबरला निकाल जाहीर केला जाईल.