Rashmi Mane
राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. आज या अधिवेशनाचा दुसरा आठवडा.
दरगडग्रस्त भागातील नागरिकांचं पुनर्वसन, शेतकऱ्यांचं नुकनसान, निधी वाटप तसेच त्र्यंबकेश्वर वाद या मुद्द्यांवर विरोधकांनी राज्य सरकारला घेरलंय.
विधानसभेच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आज राज्य सरकारविरोधात आंदोलन केलं. हातात टाळ आणि डोक्यावर वारक-यांची टोपी परिधान करत विरोधक विधानभवनाच्या पाय-यांवर जमले होते...
यातच राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या दोन गटांमधील कट्टर विरोधकांची गळाभेट विधान भवन परिसरात लक्षवेधी ठरली आहे. या दोघांमधली राजकारणापलीकडची मैत्री दिसून आली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात सध्या टोकाचे राजकीय मतभेद आहेत.
विधानसभेत जरी हे आमदार एकमेकांविरोधात उभे राहिले असले, तरी सभागृहाबाहेर मात्र ते आजही जुने सहकारी आणि पक्के मित्रच आहेत.
मतभेद असले तरी विधानभवनात दोघेही समोरासमोर आले तेव्हा चक्क दोघांनी एकमेकांना मिठी मारली. विशेष म्हणजे दोघांमध्ये बराच वेळ चर्चा सुरू होती.
यामुळे विधानभवनाच्या आवारात सर्वांचेच लक्ष दोघांनी वेधलं होतं. या दोघांमधील मैत्रीची चर्चा विधानभवनात सर्वत्र सुरु होती.