अनुराधा धावडे
पोलिस म्हटलं की सर्वात आधी खाकी वर्दी डोळ्यासमोर येते.
वर्षातील ३६५ दिवस २४ तास आपल्या सेवेसाठी कर्तव्यावर असणाऱ्या महाराष्ट्र पोलिस दलाचा स्थापना दिवस पार पडला.
महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर २ जानेवारी १९६१ रोजी महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना करण्यात आली.
देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला ध्वज प्रदान केला
''सद्रक्षणाय खलनिग्रहणाय'' हे महाराष्ट्र पोलीसांचे ब्रीदवाक्य आहे.
या ब्रीदवाक्याचा अर्थ असा होतो की, महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटीबध्द आहेत.
महाराष्ट्र पोलीस दल हे देशातील सर्वांत मोठ्या पोलीसदलांपैकी एक असून यात १२ पोलीस आयुक्तालये आणि ३४ जिल्हा पोलीस घटक आहेत.
सध्या महाराष्ट्र पोलिस दलात सुमारे १ लाख ८० हजाराहून अधिक मनुष्यबळ आहे.
राजधानी मुंबईत महाराष्ट्र पोलिसांचे मुख्यालय आहे.
पोलीस महासंचालक हे महाराष्ट्र पोलिसांचे प्रमुख असतात. रजनीश सेठ हे महाराष्ट्राचे सध्याचे पोलिस महासंचालक आहेत.