Maharashtra Political Leader : विरोधी पक्षनेतेपदावरुन थेट मंत्रिपदावर विराजमान झालेले राजकीय नेते !

Deepak Kulkarni

शरद पवार...

शरद पवार यांनीही विधानसभेच्या एकाच टर्ममध्ये विरोधी पक्षनेतेपदावरून मंत्रिपदावर झेप घेतलेली असली तरी त्यासाठी त्यांना 2 वर्षांची प्रतीक्षा करावी लागली होती.

Maharashtra Political Leader | Sarkarnama

नारायण राणे

नारायण राणे यांनी विरोधी पक्षनेतेपदासह आमदारकीचाही राजीनामा दिला. यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षाने त्यांना सरकारमध्ये सहभागी करून घेत महसूल मंत्रिपदाची जबाबदारी दिली

Maharashtra Political Leader | Sarkarnama

देवेंद्र फडणवीस

महाविकास आघाडी सरकारच्या काळात तब्बल अडीच वर्ष देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते होते. यानंतर एकनाथ शिंदेंच्या सरकारमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्रीपदासह गृहमंत्री म्हणून काम पाहत आहे.

Maharashtra Political Leader | Sarkarnama

राधाकृष्ण विखे पाटील

23 डिसेंबर 2014 रोजी राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विरोधी पक्षनेते म्हणून पदभार स्वीकारला. अखेर 5 जून 2019 रोजी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन भाजपा शिवसेना युती सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला.

Maharashtra Political Leader | Sarkarnama

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे 12 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2014 असे जवळपास 23 दिवस विरोधी पक्षनेते या पदावर होते. शिंदे यांनी फडणवीस- ठाकरेंच्या चर्चेनंतर मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी देण्यात आली.

Maharashtra Political Leader | Sarkarnama

अजित पवार

राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार पक्षातील इतर 8 सहकाऱ्यांना सोबत घेऊन फडणवीस-शिंदे सरकारमध्ये सहभागी झाले. विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देत अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

Maharashtra Political Leader | Sarkarnama

एकनाथ खडसे

२००९ पासून ते २०१४ पर्यंत ते महाराष्ट्र विधानसभेत भारतीय जनता पक्षातर्फे विरोधीपक्ष नेता होते. २०१४ मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप सरकारमध्ये खडसे महसूलमंत्री व कृषीमंत्री बनले.

Maharashtra Political Leader | Sarkarnama

धनंजय मुंडे

फडणवीस सरकार सत्तेत असताना महाराष्ट्र विधान परिषदेत धनंजय मुंडे हे विरोधी पक्षनेते होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे कॅबिनेट मंत्री झाले.

Maharashtra Political Leader | Sarkarnama

NEXT : पारंपारिक गाणी अन् गुडघाभर चिखल, भास्कर जाधवांनी केली भात लावणी; पाहा खास फोटो !

येथे क्लिक करा