Pradeep Pendhare
विधान परिषद निवडणुकीत तीन जागांचा पराभव अन् महायुतीत वादाची ठिणगी पडल्याने निकालानंतर भाजप आणि शिंदे शिवसेनेत आरोप-प्रत्यारोप सुरू झाले.
नवनाथ बन यांनी थेट शिंदे शिवसेनेला धारेवर धरत, पुण्यात मित्रपक्षाने स्वतंत्र उमेदवाराला पाठिंबा देत महायुती धर्म पाळला का? असा सवाल केला.
'लायकीत राहून बोला', असा नीलेश राणेंचा नवनाथ बन यांना थेट इशारा दिला. एकनाथ शिंदेंवर बोलताना मर्यादा पाळण्याचा असा सल्ला दिला आहे.
सर्व जागा भाजपनेच लढवायच्या का? असा सवाल एकनाथ शिंदे शिवसेनेने केला आहे. पुण्यात भाजपच्या उमेदवार निवडीवरच नाराजी व्यक्त केली.
छत्रपती संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तारांच्या भूमिकेवर भाजपबरोबरच राष्ट्रवादीने नाराजी व्यक्त केली. मंत्री हसन मुश्रीफ यांनीही सत्तारांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली.
रवींद्र धंगेकरांनी मैत्री निभावता येत नसेल तर? असा प्रश्न करत टीका केली. भाजपला हा निकाल म्हणजे सरकारच्या कामकाजाचा कौल आहे.
प्रवीण दरेकरांनी, युतीत राहून विरोध खपवून घेणार नाही! असा शिंदे शिवसेनेला इशारा दिला. महायुतीच्या हिताविरोधात काम करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे.
एकनाथ शिंदेंनी मौन सोडत, आम्ही युतीधर्म पाळलाच! असे सांगताना पुण्यात मैत्रीपूर्ण लढत असल्याचा मुद्दा मांडला. मित्रपक्षांमधील समन्वयाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला.
एकनाथ शिंदेंना लक्ष्य केल्यास उद्धव ठाकरेंची शिवसेना मजबूत होईल? असे म्हणत संजय निरुपम यांनी सार्वजनिक टीकेऐवजी समन्वयाची बैठक घेण्याची मागणी केली.
फडणवीस-शिंदे-पवार एकत्र बसून महायुतीतील वाद मिटवण्याचे आव्हान आहे. निवडणुकीतील पराभवाची कारणे शोधण्याची तयारी करावी लागणार आहे.