Rashmi Mane
आज महात्मा गांधींची 154 वी जयंती नरेंद्र मोदी यांनी राजघाटावर जाऊन गांधीजींच्या समाधीला अभिवादन केलं.
आजचा दिवस जगभरात 'आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन' म्हणून साजरा केला जातो.
आज संपूर्ण देशात गांधी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे.
2 ऑक्टोबर 1869 ला गुजरातमधील पोरबंदर या ठिकाणी महात्मा गांधींचा जन्म झाला होता.
गांधी जयंतीनिमित्त देशभरात स्वच्छता अभियान राबवलं जात आहे.
गांधीजींनी 'अहिंसा परमो धर्म:' या विचाराची ताकद जगाला जाणवून दिली.
साधी राहणी, उच्च विचार आणि सत्य तसेच अहिंसेच्या मार्गावर चालणारे त्यांचे विचार आणि तत्त्व आजही जगाला शांततेचा मार्ग दाखवत आहेत.