Vijaykumar Dudhale
महाविकास आघाडीतील युवक संघटनांचा मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे युवा महाराष्ट्राभिमान मेळावा पार पडला.
या मेळाव्याला राष्ट्रवादी युवक काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, युवा सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव आणि युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सहभागी झाले होते. याशिवाय या तीनही पक्षाचे जिल्हाध्यक्षही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
युवा महाराष्ट्रभिमान मेळाव्यात मेहबूब शेख, वरुण सरदेसाई आणि कुणाल राऊत यांनी मोदी सरकारच्या रोजगार धोरणांवर कडाडून हल्ला केला.
मोदी सरकारच्या काळात देशाच्या इतिहासात 45 वर्षांमधील सगळ्यात मोठी बेरोजगारी निर्माण झाली आहे, असा आरोप या युवा नेत्यांनी आपल्या भाषणातून भाजप सरकारवर केला.
नरेंद्र मोदींनी पंतप्रधान होण्याआधी मोठमोठी आश्वासनं दिली होती. पण, मोदींनी एकही आश्वासन पूर्ण केले नाही, असाही दावा या युवा नेत्यांनी केला.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीच्या युवक नेत्यांनी महायुतीच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे.
भाजप सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची भूमिका युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनी मांडली.
आगामी लोकसभा निवडणुकीत सर्व युवक संघटनेच्या वतीने वाढती बेरोजगारी, महागाई या बद्दल जागृत करणे, सर्व बूथपर्यत जाऊन मतदान करणे, आपल्यातील हेवेदावे, मानापमान विसरून पक्षाला मजबूत करण्यासाठी झटायचा निश्चिय उपस्थित पदाधिकाऱ्यांनी केला.
कोण आहेत जीएन साईबाबा? ज्यांची तब्बल 7 वर्षांनंतर नागपूर तुरुंगातून झाली सुटका