सरकारनामा ब्यूरो
औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम काळे हे विजयी झाले आहेत.
महाविकास आघाडीचे विधान परिषदेचे उमेदवार विक्रम काळे यांनी भाजपचे उमेदवार किरण पाटील यांचा ६ हजार ९३७ मतांनी पराभव केला आहे.
विक्रम काळे यांनी मतदार संघातून सलग चौथ्यांदा विजय मिळवला आहे.
विक्रम काळे यांचे वडील वसंतराव काळे यांनी पदवीधर मतदारसंघातून दोन वेळा तर शिक्षक मतदारसंघातून एक वेळा विजय मिळवून विधानपरिषदेत पोहोचले होते. काळे यांनी त्यांच्या वडीलांचाच विक्रम मोडला आहे.
काळे कुटुंबाकडे सातव्यांदा आमदारकी आली आहे.
काळे यांचे कुटुंब मुळचे उस्मानाबाद जिल्ह्यातील पळसप या गावचे.
पळसप येथे शालेय शिक्षण पुर्ण झाल्यानंतर त्यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी पदवी शिक्षण घेतले.
2004 मध्ये राष्ट्रवादीचे वसंत काळे यांनी मराठवाडा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेतला. तेव्हापासून हा मतदारसंघ कायम राष्ट्रवादीकडेच राहिला आहे.