Mahua Moitra: परदेशातील नोकरी सोडून राजकारणात 'एन्ट्री' घेणाऱ्या महुआ मोइत्रा, पाहा फोटो!

सरकारनामा ब्यूरो

संसदेतील आपल्या पहिल्याच भाषणापासून देशभरात चर्चेत असलेल्या महुआ मोइत्रा यांचा जन्म ५ मे १९७५ ला कोलकाता येथील एका बंगाली कुटुंबात झाला.

Mahua Moitra | Sarkarnama

आसाममध्ये जन्मलेली मोइत्रा यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण कोलकात्यात पुर्ण केल्यानंतर उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेल्या. मॅसेच्युसेट्समधील माउंट होल्योक कॉलेजमधून त्यांनी गणित आणि अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केली आहे.

Mahua Moitra | Sarkarnama

शिक्षण पूर्ण केल्यानंतर, मोइत्रा यांनी जेपी मॉर्गन या कंपनीमध्ये प्रवेश केला आणि एक गुंतवणूक तज्ञ म्हणून त्यांच्या करिअरला सुरुवात केली. 2008 मध्ये, महुआने तिची नोकरी सोडून भारतात परतण्याचा निर्णय घेतला आणि काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

Mahua Moitra | Sarkarnama

मोइत्रा यांनी 2009 मध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश करत, आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. राहुल गांधींच्या 'आम आदमी के शिपाही' प्रकल्पाच्या त्या प्रमुख सदस्य होत्या. मात्र त्या काँग्रेससोबत जास्त काळ राहिल्या नाहीत.

Mahua Moitra | Sarkarnama

मोइत्रा वर्षभरानंतर काँग्रेस सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये गेल्या. 'टीएमसी'ने त्यांना 2016 मध्ये करीमपूर विधानसभेचे तिकीट दिले आणि त्या जिंकल्या.

Mahua Moitra | Sarkarnama

2019 मध्ये टीएमसीच्या अध्यक्षा ममतांनी त्यांना कृष्णा नगर मतदारसंघातून लोकसभेचे तिकीट दिले. मोइत्रा ममताच्या अपेक्षांवर खऱ्या उतरल्या आणि पहिल्यांदाच संसदेत पोहोचल्या.

Mahua Moitra | Sarkarnama

पहिल्याच भाषणात NRC च्या मुद्द्यावरून संसदेत सरकारवर हल्लाबोल करत महुआ प्रसिद्धी झोतात आल्या.

Mahua Moitra | Sarkarnama

मोइत्रा नेहमीच वेगवेगळ्या मुद्द्यांवर परखडपणे मत माडतांना दिसतात.

Mahua Moitra | Sarkarnama

नवनिर्वाचित संसद सदस्यांमध्ये त्या सर्वात प्रतिभावान संसदपटू मानल्या जातात.

Mahua Moitra | Sarkarnama
येथे क्लिक करा