Ganesh Sonawane
प्रसिद्ध गायिका मैथिली ठाकूर या आता आमदार झाल्या आहेत.
अलीनगर विधानसभा मतदारसंघ जिंकल्यानंतर भाजप आमदार मैथिली ठाकूर जोरदार कामाला लागल्या आहेत.
निवडणूक जिंकल्यानंतर सुटी, आराम किंवा व्हेकेशन या शब्दांचा अर्थ विसरली आहे असं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
त्या म्हणे, मला आतून एक स्ट्राँग फिलिंग येत आहे की, मी आणखी उशीर करू शकत नाही. मला फक्त काम करायचं आहे.
निवडणूक प्रचारादरम्यान, लोकांनी मैथिली यांना परिसरातील अनेक प्रमुख समस्यांबद्दल माहिती दिली होती.
मैथिली म्हणाल्या की, "आमच्या टीमने या समस्यांची एक विस्तृत यादी तयार केली आहे. आता पदाची शपथ घेतल्यानंतर लगेचच या मुद्द्यांवर काम वेगाने सुरू होईल.
प्रत्येक कामाची सुरुवात कशी करायची याचं नियोजन करण्यासाठी दररोज मी टीमला भेटते असं मैथिली यांनी सांगितले.
आमदार होणं म्हणजे फक्त एक खूर्ची नसून लोकांच्या जीवनात बदल घडवून आणणं हेच ध्येय आहे असही त्या म्हणाल्या.