Amit Ujagare
1) अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी शनिवारी पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर अमेरिकेच्या 'फर्स्ट व्हिसा फ्रेमवर्क'ची घोषणा केली.
2) अमेरिकेच्या या Visa धोरणातील महत्वाच्या बदलामुळं भारतीयांना अनेक फायदे होणार आहेत. पण यामुळं काय गोष्टी बदलतील जाणून घेऊयात.
3) यामुळं त्या व्यावसायिकांना प्राधान्य दिलं जाणार आहे जे दोन्ही देशांमध्ये व्यावसायिक आणि रणनीतीचे संबंध अधिक मजबूत करतील.
4) ही नवी सुविधा अमेरिकनं सरकारचा खर्च कमी करण्यास मदत करणार आहे. यामुळं कामकाज अधिक वेगवान, थेट आणि प्रभावीपणे होणार आहे.
5) यामुळं भारतातील बडे व्यावसायिक आणि गुंतवणुकदारांना फायदा होणार आहे. त्यांना प्राधान्यानं हा व्हिसा उपलब्ध करुन दिला जाणार आहे.
6) ही योजना केवळ अमेरिकेबाहेरच्या नागरिकांसाठीच नव्हे तर त्या अमेरिकेतील त्या कर्मचाऱ्यांसाठी देखील आहे जे परदेशात जाऊन अमेरिकेच्या हितासाठी अन् राष्ट्रीय सुरक्षेसाठी काम करतील.
7) पंतप्रधानांची दिल्लीत भेट घेतल्यानंतर रुबियो म्हणाले, अमेरिका-भारत व्यापारी संबंधांचा विस्तार झाला असून भारतीय कंपन्यांनी अमेरिकेत २० अब्ज डॉलरहून अधिकची गुंतवणूक केली आहे.
8) दोन्ही देशांमधील हे नातं अधिक सुदृढ करण्यासाठी व्यवस्थित, सुरक्षित कॉन्स्युलर व्यवस्था गरजेची आहे. याच उद्देशानं अमेरिका फर्स्ट व्हिसा शेड्युलिंग टूलची सुरुवात करत असल्याचं रुबियो यांनी सांगितलं.