Rashmi Mane
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी शिवसेना (यूबीटी) नेते उद्धव ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
ममता बॅनर्जी यांनी उद्धव ठाकरे यांना रक्षाबंधनानिमित्त औक्षण केले आणि राखी बांधली.
ममता बॅनर्जी या 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर ला मुंबईत होणाऱ्या 'INDIA' आघाडीच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी बुधवारी मुंबईला आल्या आहेत.
ममता बॅनर्जी यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी सदिच्छा भेट दिली, यावेळी त्यांंनी आदित्य ठाकरे यांनाही राखी बांंधली.
रश्मी ठाकरे यांनी ममता बॅनर्जी यांचे जोरदार स्वागत केले.
'INDIA' आघाडीच्या बैठकीसाठी त्या काल मुंबईत दाखल झाल्या आहेत.