Manmohan Singh : देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारे अर्थतज्ज्ञ! माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा असाही करिष्मा

Rashmi Mane

डॉ.मनमोहन सिंग

आज भारताचे माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ.मनमोहन सिंग यांचा वाढदिवस ते आज 92 वर्षांचे झाले. डॉ.मनमोहन सिंग 2004 ते 2014 अशी सलग 10 वर्षे देशाचे पंतप्रधान होते.

Manmohan Singh | Sarkarnama

अर्थमंत्री

याआधी ते भारताचे अर्थमंत्रीही होते. डॉ.मनमोहन सिंग यांना भारतातील प्रमुख आर्थिक सुधारणांचे शिल्पकार मानले जातात. पीव्ही नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री असताना त्यांनी आर्थिक क्षेत्रात अनेक बदल घडवून आणले होते.

Manmohan Singh | Sarkarnama

जीवन प्रवास

मनमोहन सिंग यांचा जीवन प्रवास खूपच रोचक राहिला आहे, कारण त्यांनी राजकारणाव्यतिरिक्त अनेक पदे भूषवली आहेत.

Manmohan Singh | Sarkarnama

शिक्षण

मनमोहन सिंग यांनी केंब्रिज विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्राचे शिक्षण घेतले आणि अर्थशास्त्रात डॉक्टरेट पदवी मिळवली.

Manmohan Singh | Sarkarnama

शैक्षणिक कार्य

मनमोहन सिंग यांनी राजकारणात येण्याबरोबरच शैक्षणिक कार्यही केले आहे. त्यांनी पंजाब विद्यापीठ, दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि दिल्ली विद्यापीठातही अध्यापन केले आहे.

Manmohan Singh | Sarkarnama

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर

सिंग यांनी 1982 ते 1985 या काळात त्यांना भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यांच्या गव्हर्नरपदाच्या काळात देशातील बँकिंग क्षेत्रात अनेक आर्थिक सुधारणा करण्यात आल्या. ते देशातील आर्थिक सुधारणांसाठी ओळखले जातात.

Manmohan Singh | Sarkarnama

राजकारणात एन्ट्री

1991 मध्ये पीव्ही नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये त्यांना अर्थमंत्री बनवण्यात आले. 1998 ते 2004 या काळात ते राज्यसभेतील विरोधी पक्षनेते होते. 2004 मध्ये देशात काँग्रेसचे सरकार स्थापन झाले तेव्हा मनमोहन सिंग यांना पहिल्यांदा पंतप्रधान करण्यात आले.

Manmohan Singh | Sarkarnama

दुसऱ्यांदा पंतप्रधान

यानंतर 2009 मध्ये काँग्रेसने पुन्हा एकदा सरकार स्थापन केले, ज्यामध्ये मनमोहन सिंग दुसऱ्यांदा पंतप्रधान बनले. मनमोहन सिंग हे त्यांच्या शांत आणि साध्या स्वभावासाठी ओळखले जातात.

Manmohan Singh | Sarkarnama

वेगवेगळ्या पदांवर काम करणारे ते एकमेव नेते

सिंग यांनी अर्थशास्त्राचे व्याख्याते, भारत सरकारचे मुख्य अर्थ सल्लागार, राज्यसभा खासदार, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, संयुक्त राष्ट्राच्या साऊथ कमिशनचे सरचिटणीस, युजीसीचे अध्यक्ष, अर्थमंत्री, अर्थ खात्याचे सचिव, राज्यसभेत विरोधी पक्षनेते, पंतप्रधान अशा अनेक पदांवर त्यांनी काम केले.

Manmohan Singh | Sarkarnama

पद्मविभूषण

त्यांनी केलेल्या विविध क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. 1987 मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Manmohan Singh Birthday | Sarkarnama