Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगेंचा मेणाचा पुतळा; पाहा खास फोटो !

Rashmi Mane

प्रचंड फेमस

मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे-पाटील सध्या प्रचंड फेमस झाले आहेत.

'चलो मुंबई'

मराठा आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सध्या 'चलो मुंबई'चा नारा दिला आहे.

लोणावळ्यात मुक्काम

हजारो मराठा कार्यकर्त्यांसह मुंबईकडे रवाना झाले आहेत. आज (24 जानेवारी) जरांगे पाटील पुण्यात आहेत तर उद्याचा त्यांच्या मुक्काम लोणावळ्यात असणार आहे.

वॅक्स म्युझियम

लोणावळ्यातील वॅक्स म्युझियममध्ये चक्क मनोज जरांगे पाटलांचा पुतळा तयार करण्यात आला आहे.

जरांगेंच्या हस्ते अनावरण

या पुतळ्याचे अनावरण खुद्द जरांगे-पाटील यांच्या हस्ते होणार आहे.

ऋषीकेश अशोक म्हाळसकर

मराठा युवक ऋषीकेश अशोक म्हाळसकर यांनी त्यांच्या वडीलांच्या साथीने साकारला आहे जरांगे-पाटील यांचा मेणाचा पुतळा.

जरांगेंसारखा हुबेहुब पुतळा

अगदी जरांगे यांच्यासारखा हुबेहूब दिसणारा त्यांच्या उंचीएवढाच (5 फूट 7 इंच) हा पुतळा बनवण्यात आला आहे.

कार्ला वॅक्स म्युझियम

लोणावळा येथील ऋषीकेश वॅक्स म्युझियममध्ये साकारला आहे.