Chetan Zadpe
हभप शिवाजी महाराज यांचा जन्म बीड जिल्हयातील गेवराई तालुक्यात शेकटे या खेडे गावात मनोहर रामराव शेंबडे व सागरबाई शेंबडे या दाम्पत्यांच्या घरात दि. 12-04-1954 सोमवार या दिवशी झाला.
घराण्यात पूर्वीपासूनच वैष्णव सांप्रदायिक वारसा चालत आलेला होता. घरात सर्व माळकरी मंडळी होती व नेहमी पांडुरंगाची उपासना होत होती.
ह.भ.प. श्री जयराम महाराज यांच्या आश्रमात २ वर्षे शिक्षण घेतले. त्यानंतर पुढे ४ वर्षे जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत काढली. या ४ वर्षाच्या काळात त्यांना ह.भ.प. विठ्ठल महाराज घुले आणि ह.भ.प. मारोती महाराज कुऱ्हेंकर यांचे मार्गदर्शन लाभले.
श्री क्षेत्र नारायण गडावरील महंत ह.भ.प. महादेव महाराज यांचे निधन झाले. आपल्या कामाचे फळ म्हणून फळ म्हणून गडाचे नवीन मठाधिपतीपदावर महंत शिवाजी महाराजांची निवड केली .
नारायण गडावर आल्यानंतर शिवाजी महाराजांनी प्रथम गोशाळा बांधण्यास अग्रक्रम दिला कारण सुमारे 150 गायीसांठी उन व पावसापासून संरक्षण मिळेल असा निवारा नव्हता म्हणून ते काम त्यांनी पूर्ण केले.
हत्ती दरवाजापासून दुसऱ्या मजल्यावर कमानी, दक्षिण दरवाजा पर्यंत भिंतीचे काम करून एक मजली स्लब चे काम केले. गडावर येणाऱ्या भाविकांची दर्शनाची सोय व्हावी म्हणून दर्शन हॉल पासून मंदिरापर्यंत लोखंडी पूल तयार केला.
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे हभप शिवाजी महाराजांना खूप मानतात. त्यांचा शब्द पडू देत नाहीत. याचे प्रचिती उपोषणादरम्यान महाराजांच्या हस्ते त्यांनी पाणी प्राशन केले होते.