हैदराबाद गॅझेटियर निजामानं नव्हे 'या' इंग्रज अधिकाऱ्यानं केलं होतं तयार!

Amit Ujagare

मराठा आंदोलन

मराठा आरक्षण आंदोलनाच्या निमित्तानं हैदराबाद गॅझेटियरची चर्चा सुरु झाली आहे. पण हे गॅझेटियर म्हणजे नेमकं काय? याबाबत अनेक गैरसमज आहेत.

Hyderabad Gazzetier

विश्वास पाटील

माजी सनदी अधिकारी विश्वास पाटील यांनी प्रशांत कदम यांच्या पॉडकास्टवर बोलताना सांगितलं की, हैदराबाद गॅझेट नावाची कुठलही संकल्पना अस्तित्वात नाही.

Hyderabad Gazzetier

ब्रिटिश सरकार

ही सर्व गॅझेट्स ब्रिटिशांच्या सरकारनं अर्थात ऑल इंडिया गव्हर्नमेंटनं तयार केली आहेत.

Hyderabad Gazzetier

ब्रिटिश इंडिया

सन १८८४-८५ पासून भारतातील ब्रिटिश शासन व्यवस्था, इथला इतिहास-भूगोल, पिकं, माणसं यांची साकल्यानं माहिती यात आहे.

Hyderabad Gazzetier

रामेश्वर

यासाठी त्यांनी अनेक संशोधक, शास्त्रज्ञ कामाला लावून संपूर्ण भारताची काश्मीरपासून ते रामेश्वरपर्यंत प्रत्येक जिल्ह्याची खुलासेवार डिस्ट्रिक्ट गॅझेट तयार केली.

Hyderabad Gazzetier

निझाम डॉमिनियम

या ४००-५०० पानांच्या डिस्ट्रिक्ट गॅझेटचे जवळपास ३४ खंड आहेत. यातील पाचवा खंड 'निजाम डॉमिनियन' अर्थात हैदराबादच्या निजामाचं राज्य असा खंड आहे, त्याला हैदराबाद गॅझेट असं म्हणावं लागेल.

Hyderabad Gazzetier

विल्यम हंटर

ही डिस्ट्रिक्ट गॅझेट्स अर्थात ऑफिशिअल पब्लिकेशन ब्रिटिशांनी १८९० ते १९०० या काळात म्हणजे पहिल्या दहा वर्षातच प्रसिद्ध केली.

Hyderabad Gazzetier

महात्मा फुले

यातील विशेष गोष्ट म्हणजे महात्मा फुलेंनी ज्या हंटर कमिशनपुढे शिक्षणासंबंधीच्या प्रश्नांवर साक्ष दिली होती. हंटर नावाचे हे ब्रिटिश अधिकारी या हैदराबाद गॅझेटियरसह इतर ३४ गॅझेटियरचे संपादक होते.

Hyderabad Gazzetier

पहिली जनगणना

या गॅझेटियरचा मुख्य आधार हा ब्रिटिशांनी १८८१ साली केलेली पहिली जनगणना आहे. याती तपशीलद्वारेच त्यांनी इथला इतिहास-भूगोल लक्षात घेऊन हे सर्व डिस्ट्रिक्ट गॅझेट्स बनवली आहेत.

Hyderabad Gazzetier