Amit Ujagare
ऐतिहासिक मराठी विजय मेळाव्यात दोन्ही ठाकरे बंधू २० वर्षानंतर एकत्र आले.
एकाच व्यासपीठावर येऊन दोघांनीही दमदार भाषणंही केलं आणि मराठीजनांना एकत्र येण्याचं आवाहन केलं.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्यानं सहाजिकच शिवसेना-मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण होतं.
या मेळाव्याला तुफान गर्दी झाली होती, वरळीच्या NSCI Dome क्षमतेपेक्षा जास्त भरलं होतं.
याच ठिकाणी पहिल्यांदाच राजपुत्र अमित ठाकरे आणि उद्धवपुत्र आदित्य ठाकरे हे देखील एकत्र आलेले पाहायला मिळाले.
यावेळी राज आणि उद्धव ठाकरे यांची एन्ट्री आणि त्यांनी घेतलेली गळाभेटही चर्चेचा विषय ठरली.
एकूणच मराठीच्या मुद्द्यावर पार पडलेला हा मेळावा महाराष्ट्रात नव्या राजकारणाची नांदी घेऊन आला.
शेवटी उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात आम्ही एकत्र आलो आहोत आणि एकत्रच राहणार अशा शब्दांत युतीची घोषणाही केली.
विशेष म्हणजे या मेळाव्यात राज आणि उद्धव हे दोघे बंधूच व्यासपीठावर असले तरी त्यांच्या कुटुंबियांनी देखील यावेळी हजेरी लावली.