Sachin Tendulkar Photo Story : 'मास्टर ब्लास्टर' सचिनचा नवा रोल ; राज्य सरकारच्या 'या' अभियानाचा 'ब्रँड ॲम्बेसेडर'...

Deepak Kulkarni

ब्रँड ॲम्बेसेडर....

मास्टर ब्लास्टर क्रिकेटपटू आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर यांची राज्य सरकारच्या ‘स्वच्छ मुख अभियाना’चे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली. 

Sachin Tendulkar Photo Story | Sarkarnama

 राज्य सरकारकडून घोषणा...

राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी याबाबतची माहिती दिली आहे. 

Sachin Tendulkar Photo Story | Sarkarnama

अभियानाची सुरुवात...

मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत ‘स्वच्छ मुख अभियाना’ची सुरुवात झाली. 

Sachin Tendulkar Photo Story | Sarkarnama

‘स्वच्छ मुख अभियान’

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या ‘स्वच्छ मुख अभियाना’साठी सामंजस्य करार स्वाक्षरी कार्यक्रम पार पडला. 

Sachin Tendulkar Photo Story | Sarkarnama

सचिनवर मोठी जबाबदारी...

या अभियानांतर्गत लोकांमध्ये जनजागृती करण्याची मोठी जबाबदारी पार पाडण्यासाठी सचिन तेंडुलकर यांची निवड करण्यात आली आहे.

Sachin Tendulkar Photo Story | Sarkarnama

सामंजस्य करार

महाराष्ट्र सरकारकडून त्यांची 'स्माइल अ‍ॅम्बेसेडर' म्हणून नियुक्ती करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. 

Sachin Tendulkar Photo Story | Sarkarnama

मौखिक स्वच्छतेचे महत्त्व....

भारतीय दंत संघटनेने (IDA) तोंडाचे आरोग्य आणि स्वच्छता सुधारण्यासाठी आणि चांगल्या मौखिक स्वच्छतेचे महत्त्व भारतीयांना शिक्षित करण्यासाठी एक राष्ट्रीय अभियान सुरू केले आहे. 

Sachin Tendulkar Photo Story | Sarkarnama

पाच वर्षांसाठी निवड...

पुढील पाच वर्षे सचिन या अभियानाचा ‘स्माइल ॲम्बेसेडर’ म्हणून काम करणार आहेत.

Sachin Tendulkar Photo Story | Sarkarnama

NEXT : राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणाऱ्या; गार्गी फुले नक्की आहेत तरी कोण?