Ganesh Sonawane
महापालिकेच्या महासभेचे अध्यक्षस्थान भूषवण्याचा अधिकार, सभागृहातील कामकाज शिस्तबद्ध, नियमबद्ध व लोकशाही मार्गाने चालवण्याचा अधिकार
विषयपत्रिकेवरील चर्चा नियंत्रित करणे आणि निर्णय प्रक्रियेला दिशा देणे. महापालिकेचे अधिकृत प्रतिनिधित्व करणे (राज्य सरकार, केंद्र सरकार, इतर महापालिका, शासकीय कार्यक्रम)
महापालिकेच्या धोरणात्मक निर्णयांवर प्रभाव टाकण्याचा अधिकार. स्थायी समिती, विषय समित्या व विविध विशेष समित्यांच्या कामकाजावर नैतिक व प्रशासकीय देखरेख
शहराच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर प्रशासनाकडे स्पष्टीकरण मागण्याचा अधिकार. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात समन्वय साधण्याचा अधिकार
आपत्कालीन परिस्थितीत (पूर, साथीचे रोग, नैसर्गिक आपत्ती) प्रशासनाशी थेट समन्वय साधून निर्णय प्रक्रियेला गती देण्याचा अधिकार
शहराच्या विकासाशी संबंधित प्रस्तावांबाबत सरकारकडे पाठपुरावा करण्याचा अधिकार, प्रशासनावर नियंत्रण ठेवत जनहिताचे निर्णय सुनिश्चित करणे.
शहराच्या विकासकामांवर लक्ष ठेवणे आणि विलंब, भ्रष्टाचार रोखण्यासाठी आवाज उठवणे, नागरिकांच्या मूलभूत समस्या सभागृहात मांडणे आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घेणे.
शहराच्या प्रतिमेला साजेशी भूमिका सर्व सार्वजनिक व्यासपीठांवर मांडणे, केंद्र व राज्य सरकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पाठपुरावा करणे
महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक व दुर्बल घटकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणे. नगरसेवक आणि प्रशासन यांच्यात दुवा म्हणून काम करणे.