Medha Kulkarni Oath Ceremony: मेधा कुलकर्णींची राज्यसभा खासदारकीची शपथ चर्चेत; 'हे' आहे कारण

Deepak Kulkarni

राज्यसभेवर संधी

कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना भाजपने राज्यसभेवर संधी दिली आहे.

Medha Kulkarni Narendra Modi | Sarkarnama

निवडणूक बिनविरोध

राज्यसभेची निवडणूक बिनविरोध झाल्याने कुलकर्णी यांच्या गळ्यात खासदारकीची माळ सहज पडली.

Medha Kulkarni | Sarkarnama

शपथविधी सोहळा

राज्यसभा सदस्यांचा शपथविधी सोहळा बुधवारी (ता.3) उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या उपस्थितीत पार पडला.

Medha Kulkarni | Sarkarnama

राज्यसभा सदस्यत्वाची शपथ

यावेळी त्यांनी संस्कृत भाषेमधून राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली.

Medha Kulkarni | Sarkarnama

तिघांची राज्यसभेवर वर्णी

यंदा राज्यसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून भाजपच्या वतीने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण,पुण्यातील माजी आमदार मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे यांना उमेदवारी दिली गेली आणि या तिघांचीही राज्यसभेवर वर्णी लागली.

Medha Kulkarni | Sarkarnama

सोशल मीडियावर पोस्ट

मेधा कुलकर्णी यांनी शपथविधीनंतर आपल्या भावना सोशल मीडियावर पोस्टद्वारे व्यक्त केल्या आहेत.

Medha Kulkarni | Sarkarnama

कळवताना अत्यंत आनंद

फेसबुक पोस्टमध्ये त्या म्हणतात, 'मला कळवताना अत्यंत आनंद होत आहे की, आज सभागृहाचे आदरणीय अध्यक्ष, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या उपस्थितीत मला राज्यसभेची खासदार म्हणून संस्कृतमध्ये शपथ घेण्याचा मान मिळाला.

Medha Kulkarni | Sarkarnama

शपथ घेताना भारावल्याची भावना...

राज्यसभा सदस्य म्हणून मी आज संस्कृत भाषेतून शपथ घेताना खूप भारावून गेले.

Medha Kulkarni | Sarkarnama

मी अतिशय कृतज्ञ आहे...

'मी अतिशय कृतज्ञ आहे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे संधी दिल्याबद्दल मेधा कुलकर्णी यांनी आभारही मानले.

Medha Kulkarni | Sarkarnama

NEXT : लोकसभेच्या निवडणुकीत आतापर्यंत मोठ्या पक्षांकडून 14 महिलांना उमेदवारी; पाहा यादी!

येथे क्लिक करा...