Rashmi Mane
मराठा आरक्षणाच्या मागणीवर ठाम राहिलेले आणि शिंदे-फडणवीस सरकारला नाकीनऊ आणणारे मनोज जरांगे पाटील गुरुवारी सायंकाळी पुणे जिल्ह्यात आले.
खेड तालुक्यातील राजगुरुनगरमध्ये जरांगे पाटलांची भली मोठी सभा होत आहे.
त्यासाठी पुण्यासह राज्यभरातून लाखोच्या संख्येने मराठा बांधव दाखल झाले आहेत.
त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली आहे. या सभेसाठी पुण्यातही शंभर एकराच्या मैदानावर लोकांची गर्दी होत आहे.
त्यात अगदी लहान मुलांपासून, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांचाही सहभाग आहे.
खबरदारी म्हणून, तगडा पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.