Amit Ujagare
केंद्र सरकारनं नुकतेच जीएसटीची पुनर्रचना केली, यामध्ये अनेक जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी कमी करण्यात आला आहे. त्यामुळं या वस्तू स्वस्त झाल्या आहेत.
जीएसटी कमी झाल्यानं पॅकेजिंगच दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या किंमतीही घटल्या आहेत. यामध्ये सर्वात आदी मदर डेअरीनं आपल्या ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे.
मदर डेअरीनं दूध, तूप आणि लोण्यासह आपल्या डेअरच्या इतर पदार्थांच्या किंमतीही कमी केल्या आहेत.
त्यानुसार, आता मदर डेअरीनं UHT दुधात (टेट्रा पॅक) २ रुपये प्रति लीटरनं कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
मदर डेअरीच्या दुधाचा टेट्रा पॅक, पनीर याच्यावर आधी ५ टक्के जीएसटी होता तो आता ० टक्के झाला आहे. त्यामुळं या पदार्थांच्या दरात २ रुपयांची घट झाली आहे.
तसंच तूप, लोणी, चीज, मिल्क शेक, आईस्क्रीमवर पूर्वी १२ टक्के जीएसटी होता तो आता ५ टक्के झाला आहे. त्यामुळं या पदार्थ्यांच्या किंमती २ ते ३ रुपयांनी कमी झाल्या आहेत.
त्याचबरोबर फ्रोजन स्नॅक्स, जॅम, लोणची, पॅकेज्ड नारळ पाणी, टोमॅटो प्युरी याच्यावर आधी १२ टक्के जीएसटी होता तो आता ५ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळं या पदार्थ्यांच्या किंमती ३ रुपयांनी कमी झाल्या आहेत.
दरम्यान, देशातील दुधाचा एक मोठा ब्रँड असलेल्या अमूल डेअरीनं आपल्या दुधाच्या पिशव्यांच्या किंमती कमी होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. कारण यावर आधीपासूनच ० टक्के जीएसटी असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे.