Roshan More
एसीबीच्या पथकाने राजन साळवी यांच्या निवास्थानी झाडाझडती घेतली.
आपण कट्टर शिवसैनिक आहोत. उद्धव ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहू, असे राजन साळवी म्हणाले.
राजन साळवी यांनी भारतीय विद्यार्थी सेनेतून आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली.
रत्नागिरी नगरपरिषदेमध्ये शिवसेनेचे पहिले नगराध्यक्ष म्हणून राजन साळवी निवडून आले होते.
राजन साळवी हे 1995 ते 2004 या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख होते.
2006 मध्ये राजापूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत साळवी यांचा पराभव झाला होता.
साळवी हे 2009 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर 2014 आणि 2019 मध्ये विजय मिळवत त्यांनी विजयाची हटट्रिक केली.