Rashmi Mane
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे सध्या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत.
विद्यार्थी सेनेचे पुनर्बांधणी संपर्क अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थी सेनेची बांधणी, नवीन विद्यार्थ्यांना संघटनेत सामावून घेण्यासाठी, नव्या विद्यार्थ्यांना संधी देण्यासाठी अमित हे खान्देश दौऱ्यावर आहेत.
या दौऱ्याच्या निमित्ताने ठाकरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
धुळे शहरातील देवपूर येथील एकवीरा देवीचे दर्शन अमित ठाकरे यांनी घेतले.
दिवसभराच्या बैठका आणि गाठीभेटीतून थोडासा वेळ काढत अमित ठाकरे यांनी काही सहकाऱ्यांसह निसर्गाच्या कुशीतील सातपुडा पर्वतरांगामधील तोरणमाळला भेट दिली.
अमित ठाकरे यांनी आपल्या काही सहकाऱ्यांसह निसर्गाच्या सानिध्यात रमले आहेत.
अमित ठाकरे यांना खान्देशमध्ये विद्यार्थांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
महाराष्ट्र नवनिर्माणाच्या स्वप्नाला उभारी देण्यासाठी काम करणाऱ्या प्रत्येक घटकाशी 'ठाकरे' यांचा संवाद सुरु आहे. या खान्देश दौऱ्याच्या निमित्ताने मनसेसाठी आश्वासक चित्र नक्किच दिसत आहे...