Rashmi Mane
सडेतोड टीका आणि आपल्या रोखठोक भाषणांमुळे नेहमीच चर्चेत असणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या त्यांच्या नवीन लूकमुळे चांगलेच चर्चेत आहेत.
राज ठाकरे यांच्या या लूकचे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत.
राज ठाकरे क्रिम रंगाच्या टी- शर्ट आणि जिन्समध्ये दिसत आहेत
मनसे तर्फे 'एक सही संंतापाची' अशी स्वाक्षरी मोहिम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात सहभागी होतांना राज ठाकरे 'वेस्टर्न लूकमध्ये' दिसले.
सभा असो वा पत्रकार परिषद राज ठाकरे नेहमी पांढऱ्या रंगाच्या कुर्ता- पायजमामध्ये दिसतात.
नेहमी साध्या लूकमध्ये दिसणारे राज ठाकरे यावेळी मात्र, टी-शर्ट, जीन्स आणि काळ्या रंगाच्या गाॅगल अशा वेस्टन लूकमध्ये दिसले.
महाराष्ट्रातील राजकारणातील नेत्यांमध्ये राज यांची हॅण्डसम नेत्यांमध्ये गनना होते.
राज ठाकरे यांच्या या नव्या लूकची महाराष्ट्रात चांगलीच चर्चा रंगली आहे.